STORYMIRROR

Pandit Warade

Comedy Tragedy

2  

Pandit Warade

Comedy Tragedy

या नवोदितांनो

या नवोदितांनो

1 min
2.8K


या हो नवोदितांनो, इथे तुमचे स्वागत आहे

तुमच्या सत्कारार्थ एक छापील कागद आहे


शक्य झाले तर थोडी गुलाबाची फुलेही देऊ

थोडा वेळ मंचावर खुर्चीमध्येही स्थान देऊ


तुम्ही काहीही वाचून दाखवा टाळ्या वाजवू

तुमचे साहित्य कसेही असो चांगलेच ठरवू


आम्हाला कुठं साहित्यातलं ढेकूळ कळतंय

आम्ही फक्त बघतो आम्हाला काय मिळतंय


एवढं सगळं करायला खर्च लागेल ना भाऊ

तुम्ही आणा गहू तुम्हाला घालू आम्ही जेऊ


थोडीफार झळ तुमच्या खिशालाही लागू द्या

तुमच्या सत्कारामध्ये थोडं आमचंही भागू द्या


*कुणी मनाला लावून घेऊ नये*


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy