व्यथा माझ्या मायची
व्यथा माझ्या मायची
निसर्ग कोपला सागर उफाळला!!
कसा कुणीकडे ओला दुष्काळ
तर कसा कुणीकडे सुका दुष्काळ
माय माझी रडते कुठे टाकू ही घाण….
न होई विघटन कचर्याचे…
निचरा पाण्याचा
कसा नेसू मी शालू हिरवा?
मानव लावतो रोज शोध नवा
हवा दुषित पाणी दुषित
कसे सिंचू मी हे विश्व न्यारे
निर्मिली सिमेंट सृष्टी जाळूनी
हिरवे जंगल ह्यात दोष ना कुणाचा
फाटला माझा ओझोन मिळे ना प्राणवायू…
आहे ही व्यथा माझ्या मायची
