STORYMIRROR

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Romance

3  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Romance

व्याकुळ मन...!!!

व्याकुळ मन...!!!

1 min
406

उजळूनी टाकी 

मनाचा गाभारा 

तुझी प्रित आभा 

निरंतर....


घन निळे मेघ

बरसवी सरी

आठवांच्या उरी

अविरत....


उन्हाची किरणे

दारी रेंगाळली

स्पर्शूनिया गेली

चिंब मन...


व्याकुळ मनाच्या 

निःशब्द भावना 

हळव्या सांजेला

उमगल्या...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance