STORYMIRROR

SURESH SARGAR

Tragedy

3  

SURESH SARGAR

Tragedy

वरूण राजा

वरूण राजा

1 min
11.9K

कृष्णामाई पंचगंगेला आलाय महापुर

अनेकांचे केले हाल झाले संसार उद्ध्वस्त 

गावच्या गाव घेतली आहेत कवेत

सुंदर बांधलेले घरही आहे पवत

स्वतःच्या घरातही बसून मृत्यूला, 

यमालाही लावावे लागते पळवत 

यमही जाताना माझ्या काही बांधवांना घेऊन गेला कवेत जीवापाड प्रेम करणारी जनावरे मरून फुगून आहे पवत वरूण राजा इतका का वाईट वागतो क्रुर

कृष्णामाई पंचगंगेला आलाय महापुर 


माणगंगा का आहे पाण्यापासून दुर 

दुष्काळी पट्टा काही पाण्यापासून दूर

जत कवठेमहांकाळ आटपाडी कुठे पाहिला आहे पुर

मराठवाड्यात का बरं जात नाही? तू ते लय आहे का दूर कृष्णामाई पंचगंगापासून जत आटपाडी लय आहे का दूर

वरूण राजा तू अशी का करतोस चेष्टा क्रुर 

पूरग्रस्तांच्या अश्रूकडे तर पाहून जा दूर

कोणाला पाण्यासाठी, कोणाला पाण्यापासून रडतोस इतकी का वाईट चेष्टा करतो क्रुर 

एकदाशी येऊदे या महाराष्ट्रात, भारतात, जगात 

आनंद अश्रूंचा महापुर

नको आहे पाण्याचा महापुर वरूण राजा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy