दुष्काळ
दुष्काळ
पाऊस पडंना
दुष्काळ हटंना
ही माणसाची
चर्चा काय सुटंना?
निसर्गाशी विरोध करायचा
याचा धंदा काय मिटंना?
पावसावरील दोष
काय हटंना?
उद्योगधंद्यांनी
वातावरण पेटवलं
तापमानात ढवळाढवळ झाली
प्रदूषण कमी करायचा
यांनी नाही केला विचार
दुष्काळ हटायची पाहतात वाट?
उद्योगधंद्यानी केली
नद्या समुद्राची नाली
पाणी झाले गटारीवानी?
पुढारी येतात भाषणे देतात
पाणी देतो म्हणून मते घेतात?
निवडणुकीनंतर हे उद्योगधंद्यांनी
करतात शेतकऱ्याची हानी?
पाऊस पडना म्हणून
रोज पेपरात देतात नवीन वाणी?
विधिमंडळात म्हणतात
निसर्गाशी केले वाकडं
म्हणून सगळीकडे पडलंय
दुष्काळाचं लफडे?
समजात येतात
देवाची पूजा नाही
माणसात माणूसकी नाही
म्हणून देतात टोमणे
याचं गणित काय सुटंना
दुष्काळ काय हटंना?
निसर्गाशी माणसाचं काय जमंना
पाऊस पडायला काय मागंना
दुष्काळ हटवायला धरली जाते
प्रदूषणाची वाट
निसर्गावर करायला जातात मात
पण याचाच होतो आहे घात
दुष्काळ पडलाय म्हणून
बोंबलतात गावो-गावात?
निसर्गाशी समान वागायला
नाहीत हे जात?
दुष्काळ हटंना म्हणून
ओरडतात दिवस-रात्र?
पाऊस पडंना दुष्काळ हटंना
ही माणसाची चर्चा काय सुटंना
