वक्तृत्व
वक्तृत्व


निखळ स्वच्छ, हितकारी जगाच्या असो आपले वक्तृत्व,
मातृत्वाची जाण असावी, असे असावे दातृत्व||
कर्तव्याची व्हावी पूर्तता असे असावे कर्तृत्व,
काम व्हावे बोलण्याने असे असावे वक्तृत्व||
शब्द आपला धार असावा, कापण्या जगातील पापत्व,
अर्थपूर्ण शब्द असावे, भाषेवर असावे प्रभुत्व||
वक्तृत्वाच्या कलागुणाने, जपावे सर्वांशी बंधुत्व,
प्रभुत्वाने भाषेच्या मराठी उमटवावे हिंदुत्व||
सर्वांना पोषक ठरो असे असावे वक्तृत्व,
उणीव सारी भरून कधी शब्द असावे जीवनसत्व||
वक्तृत्वाची ख्याती असावी शब्द वचन असावा,
वक्तृत्वात, कर्तृत्वात खोटेपणा नसावा||
शब्द हे शस्त्र असतात ते हृदय चिरु शकतात,
वक्तृत्व असावे शब्द सुमने ते माणुसकी पेरू शकतात||