चहा
चहा
1 min
216
मैत्रीच्या दुनियेतील चहा ही दुवा आहे
बुद्धीस शांतता देणारी ही वेगळीच दवा आहे
चहाचा प्रत्येक घोट मनास तृप्तता देते
शीण सारा दूर करते पुन्हा नवा उत्साह देते
म्हाताऱ्यांचा सखासोबती कडक काळा चहा असतो
एकांतवास जाणवत नाही, सोबतीला चहा असतो
कॉलेजच्या जीवनात चहा म्हणजे सर्वस्वी
कँटीन गाजविते कॉलेजची आठवण देते सदैवी
सद्विचार प्रधान करते नव्या उमेदीचा श्वास देते
आवडणारा चहा गोड तो पदोपदी आस्वाद देते
अद्रक जरी तिखट असले चहास गोडवा देते
सांगता सांगते जीवनाची चहा नवा विश्वास देते
