विठ्ठल माझा
विठ्ठल माझा
विठ्ठल माझा गाव विठ्ठल माझा भाव ।
हृदयी विराजे विठ्ठल माझा ।।
विठ्ठल माझा देव विठ्ठल माझी ठेव ।
अंतरीची तळमळ विठ्ठल माझा ।।
विठ्ठल माझी भक्ती विठ्ठल माझी शक्ती ।
चौ-याशीची मुक्ती विठ्ठल माझा ।।
विठ्ठल माझी निती विठ्ठल माझी मती ।
जन्माची पुण्याई विठ्ठल माझा ।।
विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता ।
तारक गुरु विठ्ठल माझा ।।
विठ्ठल माझी माऊली विठ्ठल मायेची सावली ।
दिनदयाळू विठ्ठल माझा ।।
विठ्ठल माझा राम विठ्ठल माझा शाम ।
जन्मभरीचा विश्राम विठ्ठल माझा ।।
विठ्ठल माझी इंद्रायणी विठ्ठल माझी चंद्रभागा।
पावन भिमाई विठ्ठल माझा ।।
पुजीन मी विठ्ठल गाईन मी विठ्ठल।
जपीन अखंडित विठ्ठल माझा।।
