विरोधक
विरोधक
जरासा सत्य वागलो काय
तर सारे विरोधात गेले
सुखाचे क्षण मोजतांना
यांनी सारे हिसकावून नेले
विरोध होत गेला रोज
मी पण दुःख जवळ केले
रस्ता होता सरळ साधा तरी
चिखलात ही सोबत आले
विरोधक असतात रोज
समोर टक लावून पाहणारे
नजरेचे तिर त्यांचे घातक जरी
गरम तेलात असतात तळणारे
ताव आलेल्या तेलाला
जसा तडका दिला जातो
विरोधकांच्या काड्या चालू असतांना
काळजाचा दगड करावा लागतो
तू खूप सुधारला तू श्रीमंत झाला
कष्टाची सुधारणा यांना पाहवत नाही
बापदादाच्या पैशावर मजा करणारे हे
यांना काड्या केल्याशिवाय राहवत नाही
मग मी पण आपला रोज
दुःखाला सुखाचा मुलामा चढवत असतो
दुर्लक्ष करून समाजातील या विकृतांना
आपला काड्यांचा बंगला मढवत असतो
मी घावावर बेसन लावत असतो
सोबतीला सुगंध भरजरी मिरच्यांचा
मीठ चोळणारे रोज असतात समोर
पण भाव चढवून जातात घावांचा
