STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Romance Classics

3  

Ajinkya Guldagad

Romance Classics

वीण

वीण

1 min
296

कधी अवेळीच ब्लॉक,फोन कॉलही येतो

बोलतच नाही कोण....ऐकू श्वास येत रहातो..

किर्रर्र शांततेचा आपापसात, संप चालतो फक्त....

गरम वाटू लागते हळूहळू,धमन्यामधील रक्त...

थरथरते ओठ बोलतात,अबोल अबोल शब्द...

कान ऐकू लागतात फक्त...आसवांचे प्रलब्ध..

हुंदक्यांचा आवाज येतो...सर्दीची झेलमझेल....

बोलता बोलता आवाज जातो....हॅलो चा ही खोल...

दीर्घ श्वास देतो थोडी....जिवंतपणाची मती....

धिम्म होऊन पडते सुकलेल्या... स्वप्नांची गती...

कंप कंप करतात हळुवार हाताची बोटे दाही....

ओघळणारी आसावे देतात...ओळखीची ग्वाही....

टकटक पापन्यांचा आवाज देतो...सावरण्या संधी....

अलगद उतरत जाते ..किर्रर्रर्र रातरीची धुंदी....

संथ एकांत वाहत रहातो...सावकाश वाटत रहाते जग..

हळूहळू वाटतो श्वासांनाही ताप.... चढू लागतो मग...

काही नाही फोन अवघा....चालतो मिनिटे तीन...

जाणीव करून देतो मात्र..उसवत गेलेली वीण...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance