वेडी प्रीत
वेडी प्रीत
वेडी प्रीत तुझी
मला रे लागली
तुला मी सजना
काही ना मागली
आठवण तुझी
मला रे छळतो
विरहाने तुझ्या
जीव ही जळतो
तू रहा जवळ
हीच आहे आशा
करू नको अशी
तू माझी निराशा
तुझ्या प्रीतीची तू
बरसव नशा
तुझ्या विना बघ
कशी झाली दशा
सोड हा अबोला
तू ये मझपाशी
तुला आठवून
झोपते उपाशी
एक एक क्षण
प्रेमात झुरले
माझी वेडी प्रीत
तुझ्यात हरले
मी ना सावरले
मी गहिवरले
तुझ्या प्रीतीत मी
सख्या बावरले
आता हा रुसवा
सोड तू सजना
ये तू जवळी घे
मिठीत मजला

