STORYMIRROR

sarika k Aiwale

Classics

4  

sarika k Aiwale

Classics

वचनात   मन  हे  गुंतले।

वचनात   मन  हे  गुंतले।

1 min
268

सम समान असती काही मनी

भाव आगळीक भुलले ग जनी 


एक क्षण भ्रमरा सम वागतो 

भान उसने नशिबाला मागतो 


सांज एकली आभा मनी झुरते 

घाव कोवळा क्षितिजास देते 


आसमानी रंग मनी फुललेले 

आसक्तित भाव डोळा तरळले 


काय कोणा या जीव्हाने सांगितले 

काय वचनात  मन हे गुंतले 


ओढ किनार्याची लाटेस लागते 

आभा सुर्याची सांजेस कळते 


तृप्ती तीच याही मनी लाभली 

सागराची प्रिती धरेस कळली 


तृप्त तू तृप्ती जीवास ही लाभली 

ओढ जीवाला अशीही अंतरली  


सल तुझ्या नजरेतील सांगते

कळ जनास न जिव्हारी लागली 


मेघासही भावनेची भाषा कळे 

नभातूनी मायेची तृप्ती बरसे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics