वचन देतो तुला
वचन देतो तुला
आहेस तू माझ्यासाठी खास वचन देतो तुला
दे शेवटपर्यंत साथ अधांतरी सोडून जाऊ नको मला../धृ/
मी तुझाच तू माझीच
अशीच साथ राहू दे कायमचीच
रोज स्वप्नात येते येशील ना सत्यात उतरवायला
दे शेवटपर्यंत साथ अधांतरी सोडून जाऊ नको मला..../1/
सखे तुझं माझं नातं
जरी जग नाही स्विकारत
तरी वेगळा थाटू संसार आपला
दे शेवटपर्यंत साथ अधांतरी सोडून जाऊ नको मला.../2/
तुझी माझी प्रीत सखे
गाईल गोडवे जग अख्खे
येशील ना सोबत प्रितीचे गीत गायला
दे शेवटपर्यंत साथ अधांतरी सोडून जाऊ नको मला.../3/

