STORYMIRROR

Bharti Lakhamapure

Others

4  

Bharti Lakhamapure

Others

तूच पणती

तूच पणती

1 min
466

ओझी वाढलीत तुज पाठीवरची

सखे तू तरीही वाकली नाही

तूच होती कणा, नसून मी पणा

तेव्हां ही अन् आजही........


तूच पणती अन् तूच तेल

तूच वात अन् तूच ज्योत

तुझा प्रकाश उजळणारा

आजही आहे अन् तेव्हां ही होता.......


आयुष्यातील मार्ग तुझा खडतर

मात्र तू दणकट अन् कणखर

सुख कणभर, दुःख मणभर

तरीही तू आभाळासारखी घरभर........


तूच कामिनी, तूच दामिनी

तूच स्वामिनी , तूच रणरागिणी

त्रिवार वंदन तुजला सखे

सलामीची तूच खरी मानकरणी.........


Rate this content
Log in