शिशीर कळा
शिशीर कळा
1 min
176
येता शिशिर कळा
सुरू होई पानगळ
मना मनात सुरू होई
मग रुक्ष द्वंद्व चळवळ......
बोडखा आसंमत बघोनी
होई उदासवाने मन
परी मनास समजाविता
तेव्हांच फुटेल नवचैतन्य.....
येणे जाणे चालू राहील
तेव्हांच सृष्टी बहरलं
जीवनाचेही तसेच असते
जन्म, मृत्यू ना चुकलं......
येता शिशिर कळाच्या झळा
अंगाची होई लाही लाही
पशुपक्षी अन् वाटसरू
सावलीची जागा पाही......
हा निसर्गक्रम सदा राही चालू
तो ना कधी चुकनारं
आयुष्याचेही तसेच असते
सुख दुःख अविरत चालू राहणारं....
