जानवर
जानवर
1 min
261
मानवा का तो वासनेमुळे बने जानवर येथे
का निर्दयतेने लचके तोडतो जानवरासारखे येथे
का कुस्करल्या जातात कोवळ्या कळ्या फुलण्या आधीच येथे
का साध्याभोळ्या हरिणींचे जिव
घेतले जाते येथे
पदोपदी का निष्पाप कलीकांना
भयानकतेचे सावट येथे
का वेदनेने, भयानपणे बालिका मरणयातना सोसतात येथे
का लाडक्या पऱ्या मोकळा
श्वास घेऊ शकत नाही येथे
का नराधम, पिशाच्च मोकाट
वावरतात येथे
हे वासनांध माणसा तुला जगण्याचा अधिकार कसा येथे
का का? या प्रश्नाचे उत्तर मिळेल का येथे...
