फुलवेल
फुलवेल
1 min
488
हात हातात तुझा असावा जन्मभरी तुझा साथ असावा
सोडून सगळा ताण तणाव
चल राणीवणी हुदंळून याव
मी तुझा तू माझी नेहमीच
राहो साथ कायमचीच
आसमंतात साऱ्या चर्चा तुझी न माझी
बहरू दे फुलवेल प्रेमाची सजणी माझी....
हा चंद्र आहे साक्षीला तुझ्या माझ्या प्रितीला
येईल चांदण्या तुझ्या माझ्या भेटीला....
ठेऊ प्रीत आपली अजरामर सखे
गाईल गोडवे अपूल्या प्रेमाचे सखे
