STORYMIRROR

Sarita Kaldhone

Tragedy

3  

Sarita Kaldhone

Tragedy

वाट पहाती सारे

वाट पहाती सारे

1 min
12K

माणुसकीच्या माणुसपणाला इथे

लागतोय रोज कलंक

 प्रेमाच्या नावाखाली मारती

 क्रूर वासनेचा डंख


आधुनिक युगाच्या गप्पात

सुंदरता असते शाप

संस्कारांची बीजे कुजली

स्वराचार उठला वारेमाप


वावटळीत भावनांचा उद्रेक 

फोडून टाहो सांगती

मिळेल का दान 

निष्पाप जाती जीवांती


न्यायदेवता आहे आंधळी

किती जीवांना जाळी

निर्भया ,प्रियांका ,अंकिता

कित्येक जाती बळी


पळवाटा कायद्याच्या अगणित

उरला ना कशाचा धाक

थरार उघड्या डोळ्यांनी

गर्दी करते डोळेझाक


वाट पाहती सारे

जिजाऊ शिवबाचा न्याय

अत्याचाराचे डोंगर वठतील

निपटून सारे अन्याय...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy