वाट चालता चालता
वाट चालता चालता
वाट चालता चालता नागमोडी झाली
वळणावरी मी त्या अशी एकटीचं राहिली
गंध तेव्हा फुलांचा मज सांगून काही जाई
तू एकटीच आहेस पण मी सोबती तुझ्या पायी
काटे जरी बोचले तरी शिकून तुला मी जाई
कोण आपली, कोण परकी समजावून तुला ती देई
वाट चालता चालता नागमोडी झाली
वळणावरी मी त्या अशी एकटीच राहिली
अंधार मज बरोबरी जणू माझा प्रियकर बनूनी
कधी सोडली न,सोबत जरी गेले मी हरवूनी
त्याचाच एक आधार त्याचाच मज दिलासा
भरलेल्या त्या हृदयाला वाटतो तो हवाहवासा.

