STORYMIRROR

Sant Tukaram

Classics

2  

Sant Tukaram

Classics

उठा सकळजन उठिले

उठा सकळजन उठिले

1 min
14.9K


उठा सकळजन उठिले नारायण ।

आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥


करा जयजयकार वाद्यांचा गजर ।

मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥२॥


जोडोनिया दोन्ही कर मुख पाहा सादर ।

पायावरी शिर ठेवूनियां ॥३॥


तुका म्हणे काय पढियते ते मागा ।

आपुलाले सांगा दु:ख सकळ ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics