उतराई
उतराई
स्टोरीमिरर मराठी विभाग आयोजित काव्य लेखन स्पर्धा
विषय -- आठवणीतील क्षण
शीर्षक--- *उतराई*
माझ्या आठवणीतील "त्या" क्षणाने
अशी केली किमया
की बघता बघता माझ्या जीवनाची
'बदलूनच' गेली दुनिया l1l
दहा वर्ष माझ्या उदरी "अंकुर" रुजेना
उंब-यावरी इवली पावलं काही उमटेना
डाॅक्टर देव नवस झाले
तरी "कूस" माझी उजवेना l2l
एकेदिनी निश्चयाचा 'मेरु' उभा ठाकला
"दत्तक" घेऊया 'बालिकेला'
माझ्या मनी विचार ठसला
त्वरीत 'बालकाश्रमाचा' रस्ता मी धरला l3l
कायदा नियमांचं पालन करुन
चिमुकला 'जीव' माझ्या ओटीत आला
परीराणीच्या मऊ गुलाबी 'स्पर्शाने'
"ऊर" माझा दाटला l4l
"मातृत्वाच्या" सुखाचा प्याला आता भरला
माझ्या आठवणीतील तोच 'क्षण' सुवर्णाचा ठरला
परी माझी वाढू लागली दिसामासाला
'आनंदाचे डोही आनंद तरंगला' l5l
त्या इवल्या बोळक्या मुखातून
जेव्हां शब्द उमटला "आई"
तेव्हां अमृतवर्षाव झेलत म्हटलं
बाळा होऊ कशी *उतराई ?* l6l
