STORYMIRROR

Alka Vadhavkar

Others

3  

Alka Vadhavkar

Others

शब्दांचे मोती

शब्दांचे मोती

1 min
155

माय मराठीची अक्षरे ऐसी

जी अमृताते पैजा जिंकती

 एकएक अक्षरासी गुंफता

 त्या शब्दांचे मोती होती l


 शब्द अपूर्व अनमोल असती

भाषेचे सौंदर्य वाढविती

 शब्दात वसे साक्षात सरस्वती

 तिज पूजता शब्दांचे मोती होती l 


श्रीकृष्णाच्या गीतेमधी तर 

अलौकिक शब्दांच्या माळा असती 

ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील

 सा-या शब्दांचे मोती होती l 


संतवाणीतून झरझरणा-या

 शब्दांची कैसी वर्णावी महती? 

अन् बाळमुखातून बोल उमटता 

त्या शब्दांचे मोती होती l 


सिद्धहस्त कवी लेखक बोटी

 भाग्य घेऊनी शब्द जन्मती

 साहित्याच्या दरबारामधी

 त्या शब्दांचे मोती होती l 


गायकांची मैफल सजता

 सुरेल ताना सारे छेडिती

 गीतकाराची किमया ऐसी की

 त्या शब्दांचे मोती होती l


 शब्द ही तर देणगी मोठी 

संवादाचा ते पूल बांधिती 

आदान प्रदान विचारांचे होता

 त्या शब्दांचे मोती होती l


 शब्द जणूं एक शस्त्र दुधारी

 जवळीक दुरावा त्यांचे हाती

 शब्दांच्या तर अनेक जाती

 कोमल शब्दांचे मोती होती l 


अमूर्त भावना मनी दाटता 

शब्दरूपे अलवार उतरती

 सृजनता ही सुखावूनी जाता

 ओघळणा-या शब्दांचे मोती होती l 



साहित्याला गुण द्या
लॉग इन