STORYMIRROR

Alka Vadhavkar

Others

4  

Alka Vadhavkar

Others

शीर्षक पाऊस आला बरसबरसूनी

शीर्षक पाऊस आला बरसबरसूनी

1 min
263

 ग्रीष्मातील काहिली शमवूनी 

वैशाखाचा वणवा विझवूनी

 नभी मेघावरी स्वार होऊनी 

पाऊस आला बरसबरसूनी l


सवेत अत्तर कुपी घेऊनी

 वसुंधरेच्या तनुवर शिंपूनी

 श्वासात अलवार मृदगंध भरुनी

 पाऊस आला बरसबरसूनी l


 पाझरणारे कुंभ घेऊनी

 सप्तरंगी त्या कमानी खालूनी

 इंद्रधनुचा खेळखेळूनी 

पाऊस आला बरसबरसूनी l 


थेंब टपोर मोती होऊनी

 पानोपानी नक्षी कोरुनी

 फुलाफुलांचा मंडप सजवूनी

 पाऊस आला बरसबरसूनी l 


अवघी सृष्टी पांचूची करुनी

 गर्भात तिच्या अंकुर रुजवूनी

 मयुरा पायी चाळ बांधूनी

 पाऊस आला बरसबरसूनी l 


ऋतू हिरवा ऋतू बरवा करुनी 

 सृष्टीचे जणूं कोलाज बनूनी 

तनामनासी चिंब भिजवूनी

 पाऊस आला बरसबरसूनी 

पाऊस आला बरसबरसूनी l


साहित्याला गुण द्या
लॉग इन