उन्हाळा
उन्हाळा
पूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागायची, कोकीळ गायनाने..
आता मात्र अंगावर शहारे
सततच्या ऐम्बुलन्सच्या सायरणने...
परीक्षा झाल्यावर मामाच्या गावाला जायसाठी आतुर आम्ही,
मामाच्या गावच्या मृतांचा आकडा मोजतोय..
त्याच्या घरचा हापूस मात्र आमची उगाच वाट पाहात उतरतोय..
नारळ, पोफळी तशीच आजोळच्या दारी वाऱ्यानी झुलत असेल का?
निळ्याशार समुद्राच्या थंडगार लाटा सतत मारत आहेत हाका...
रणरणत्या उन्हात..
गुलमोहरही फुले गाळत उदास..
भयाण शांततेत..
का ,कसले होत आहेत भास..
शाळा बंद, रस्ते शुकशुकाट, देव बनून बसलेत क्वारंटाईन..
हा उन्हाळाही काय बंद गजातून हिरव्यागार श्रावणसरीची वाट पाहण्यात जाईन?
