कोरोना साद
कोरोना साद
परमेश्वरा कोरोना कहर
थांबव की..
मनुष्य बाळाने देवाला
साकडे घातले..
तुझा टार्गेट पूर्ण
झालाय का ?..
परमेश्वराने हळूच
यमाला मेल पाठवून विचारले..
चित्रगुप्त मेल
हॅक करून मध्येच बोलला..
मी लिहिलेल्या
भाग्य प्रोग्रामप्रमाणे माणूस
वागत नसल्याने..
नेहमीप्रमाणे प्रोग्राम बिघडून
माझाही टार्गेट अपूर्णच राहिला..
देव आणि मनुष्य
कोणाचे ऐकावे..
परमेश्वराला कळले नाही..
पृथ्वीतलावर बिचारा राहून राहून पाही..
शाळा, देवालये बंद..
काही ठिकाणी रांगच रांग..
काळजीपूर्वक पहातो तर..
होते ते मद्यालयाचे दुकान..
पोलीस उन्हात तापत..
टाळेबंदी अंमलबजावणीसाठी होते त्रस्त..
सामान्य जनता मात्र पिशव्या घेऊन
पाय मोकळे करण्यास फिरत होती मस्त..
दवाखान्यात होती भली मोठी रांग..
बेड मिळेल थांब तुला, डॉक्टर बोलले
थोड्या वेळात गचकेल कोणीतरी तू जरा थांब..
पुन्हा बाळाची साद येताच
परमेश्वराला कळले..
हे बाळ स्वकर्तुत्वाने बिघडलेय..
म्हणून सारे देव पुन्हा दगड होऊन बसले
