STORYMIRROR

Arati Bansode

Inspirational Children

2  

Arati Bansode

Inspirational Children

उमलून पाहणा-या कळ्या

उमलून पाहणा-या कळ्या

1 min
7

वेलीवरची होऊनी फुले,आंगणात दरवळतात 

मुली

क्षण सोनेरी,मन माहेरी,सोडून दूर जातात

मुली

हवा तुला तो,वंशदीप,ठोकण्यास तुज

वृध्दपणी?

बघ नाव तूझे,उज्वल करण्या,समई होऊन जळतात

मुली


मुलगी,आई,ती बहिण कधी,पत्नी होऊन मैत्रिण

कधी

संकटकाळी,पुरुषांनाही,जीवनात सावरतात

मुली

सैनिक,नाविक,वैमानिकही,गिर्यारोहक,

वैज्ञानिकही

खंबीरपणे,देशाचेही नेतृत्त्व आता करतात

मुली

लाजविणारे बघ मुलासही,कर्तृत्व बघून दिपतात

नयन

सावित्रीचा वारसा खरा,या जगात चालवतात  

मुली


नाजूकतेने,कोमलतेने,घडवा त्यांना

संस्काराने

आपुलकी,प्रेम,जिव्हाळ्याचे,सरल्यावरही उरतात

मुली

ते मायबाप मी म्हणू कसे? चाचपती जे गर्भास

आता

ते कसाब जन्माचा आधी,गर्भातच चालवतात

मुली

या आत्मपरिक्षण करु जरा,त्या रुढी जुन्या ठोकरु

जरा

का समाजात हुंड्यापायी,दिवसाढवळ्या मरतात

मुली?

तो लेक असे जर दीप तुम्हा,लेकि नाही पणती

समजा!

बाबांनो हत्या करु नका "गर्भातून" ओरडतात 

मुली!

                             

वेलीवरची होऊनी फुले,आंगणात दरवळतात

मुली

क्षण सोनेरी,मन माहेरी,सोडून दूर जातात

मुली

हवा तुला तो,वंशदीप,ठोकण्यास तुज

वृध्दपणी?

बघ नाव तूझे,उज्वल करण्या,समई होऊन जळतात

मुली


मुलगी,आई,ती बहिण कधी,पत्नी होऊन मैत्रिण

कधी

संकटकाळी,पुरुषांनाही,जीवनात सावरतात

मुली

सैनिक,नाविक,वैमानिकही,गिर्यारोहक,

वैज्ञानिकही

खंबीरपणे,देशाचेही नेतृत्त्व आता करतात

मुली

लाजविणारे बघ मुलासही,कर्तृत्व बघुन दिपतात

नयन

सावित्रीचा वारसा खरा,या जगात चालवतात 

मुली


नाजूकतेने,कोमलतेने,घडवा त्यांना

संस्काराने

आपुलकी,प्रेम,जिव्हाळ्याचे,सरल्यावरही उरतात

मुली

ते मायबाप मी म्हणू कसे? चाचपती जे गर्भास

आता

ते कसाब जन्माचा आधी,गर्भातच चालवतात

मुली

या आत्मपरिक्षण करु जरा,त्या रुढी जुन्या ठोकरु

जरा

का समाजात हुंड्यापायी,दिवसाढवळ्या मरतात

मुली?

तो लेक असे जर दीप तुम्हा,लेकि नाही पणती

समजा!

बाबांनो हत्या करु नका "गर्भातून" ओरडतात 

मुली!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational