STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Romance

3  

Neha Ranalkar(Nawate)

Romance

उधाण वाऱ्याचे

उधाण वाऱ्याचे

1 min
331

गाणे उधाण वाऱ्याचे

गीत प्रेमीयुगुलांचे 

फुलते, झुलते हळूच का मोहरते

धुंदीत यौवनाच्या जे डोलते

गायन उधाण वाऱ्याचे...१


संगीत नदी झऱ्यांचे

कोसळत्या धारेचे

पडणाऱ्या सरींचे

स्वच्छंदी विहरणा-या

गोड पक्षांच्या परांचे

सगीत उधाण वाऱ्याचे...२


परिमळ गंध फुलांचे

दरवळ पहिल्या मृद्गंधाचे

सुगंधित त्या शीतल वाऱ्यांचे

मृगाच्या नाभितल्या कस्तुरीगंधाचे

सुगंध उधाण वाऱ्यांचे...३


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance