STORYMIRROR

Sameer Govind Gudekar

Romance

3  

Sameer Govind Gudekar

Romance

तूच...

तूच...

1 min
15.2K


तूच भावना तूच अर्थ
तूच यमक तूच अलंकार!
तूच प्रेम आणि तूच नकार
तूच हृदय तूच मन
तूच जखम तूच व्रण
तूच वेदना आणि तूच संजीवन
तूच आनंद तूच अश्रु
तूच पाऊस तूच वारा
तूच गारवा आणि तूच गारा..!
तूच पहाट तूच दुपार
तूच संध्या तूच रात्र…
तूच अंगण आणि तूच आभाळ छत्र..!
तूच गाणं तूच संगीत
तूच स्वर तूच सार.
तूच निर्मळ आणि तूच सूर…!
तूच आहेस तूच होतीस
तूच राहणार तूच फक्त
तूच पूर्ण आणि तूच रिक्त…!!


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Romance