तू जर परत येणार नसशील तर..
तू जर परत येणार नसशील तर..
तू जर परत येणार नसशील तर ,मी वाट का पाहू??
तुझ्या आठवणीत मी हा असा झुरत का राहू ?
आयुष्यात चार सुखाचे क्षण घेऊन आलीस,
थोड्या दिवसाकरिता का होईना तू माझी झालीस..
माझ्यासोबत फोनवर तू दिवसरात्र बोललीस..
एका भेटीसाठी खूप वाट पाहायला लावलीस .
सारे विसरून तू नव्याने जगत आहेस आता ,
मग का मी तुझ्यामधे येऊ ? आणि
तू जर परत येणार नसशील तर मी वाट का पाहू??
तुझ्या आठवणीत मी हा असा झुरत का राहू ?
मी तसा मूर्खच ,थोडा उगाच शहाणा ,
माझा प्रत्येक शब्द तुला वाटायचा टोमणा .
मग उफाळून निघायचा तुझा राग जुना ,
त्यात तुझं पण काही चूक नव्हते म्हणा,
तुझी भेट आता शक्य नाही मग
का मी भेटण्याची आशा ठेऊ?
तू जर परत येणार नसशील तर मी वाट का पाहू??
तुझ्या आठवणीत मी हा असा झुरत का राहू ?
अग ,पूर्वी सगळे होते प्रेमळ आणि गोड ,
मधेच कोणीतरी आलं आणि केली तोडफोड,
तरीसुद्धा फक्त आहे तुझीच ओढ ,
पण एक मन सांगते तिचा विचार सोड .
तुला कसं जमले माझा विचार सोडायला ,ते एकदा सांग पाहू ,
नाहीतर पुन्हा तेच ...
तू जर परत येणार नसशील तर मी वाट का पाहू??
तुझ्या आठवणीत मी हा असा झुरत का राहू ?
नाही म्हणजे तू होणार आहेस डॉक्टर ,
म्हणून सफरचंद खायचं सोडून दिले एकतर ,
त्यामुळे तरी तू दूर जाणार नाहीस असच वाटायचं फारतर,
पण झालं उलट लांब गेलीस तू तर ,
खर तर भिन्न तू भिन्न मी झाले होतो एक
आता कस तुझ्याविना राहू ??
पण जाऊदे ना मला फक्त सांग
तू जर परत येणार नसशील तर मी वाट का पाहू??
तुझ्या आठवणीत मी हा असा झुरत का राहू ?
आता तू म्हणशील कुणी सांगितलं आहे वाट पाहायला ,
आणि उगाचच माझ्या आठवणीत झुरायला ?
नाही ग ,माझं हृदय तुझ्या इतकं कठोर ,
सारं विसरून जायला!
आता तू ही थांबवू शकत नाहीस तुला स्वप्नात पाहायला..!
पुन्हा एकदा सांगतो दे साथ,उत्तुंग भरारी आपण घेऊ,
नाहीतर..
तू जर परत येणार नसशील तर का मी तुझी वाट पाहू?
तुझ्या आठवणीत का मी असा झुरत राहू??
