STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Inspirational

4  

Mahesh Raikhelkar

Inspirational

तूच, तू

तूच, तू

1 min
334

तूच राणी लक्ष्मीबाई तूच जिजाऊ

आहेस कणखर आणि तू लढाऊ


तूच सावित्री, अहिल्या तूच मदर तेरेसा

समाजसेवेचा हाती घेतलास तू वसा


तूच इंदिरा गांधी आणि तूच प्रतिभा

तुझ्या कर्तृत्वाचा कळस भिडलाय आज नभा


तूच गानकोकिळा, तूच माधुरी

गौरवलीस तू बनुनी जगतसुंदरी


तूच कल्पना चावला, तूच पी. टी. उषा

निराश मनात फुलवी तू आशा


तूच आई आणि तूच बहीण

तूच कन्या अन तूच सहचारीण


तूच दुर्गा, तूच कुलस्वामिनी

शांत, शीतल प्रसंगी तू दामिनी


तूच सानिया मिर्झा, तूच कोम मेरी

प्रत्येक क्षेत्रात घेतलीस तू उंच भरारी


तूच किरण बेदी, तूच साईना नेहवाल

तुझ्यामुळे प्रत्येक घर आनंदी खुशाल


तूच लक्ष्मी आणि तूच सरस्वती

युगानुयुगे समस्त मानव जात तुज पूजती

 युगानुयुगे समस्त मानव जात तुज पूजती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational