STORYMIRROR

Varsha Nerekar

Romance

4  

Varsha Nerekar

Romance

तू तिथे मी

तू तिथे मी

1 min
426

तू तिथे मी सदैव साक्ष

प्रकाशाचे वलय सुर्याला

सीमाच नाही ती कसली

प्रिये तुझ्या औदार्याला


तू तिथे मी भासणार

क्षितीज धरेला जणू बोले 

विलोभनीय दृश्य सखी

सायंकाळी मन डोले


तू तिथे मी बहरेन असा

ताटवा फुलांचा फुलला

गंध दरवळता सर्वत्र 

मधु प्राशना भ्रमर गुंतला


तू तिथे मी साथीला जणू

शब्दांना सूर गवसला

छेडताच वीणा बघ

मधूर स्वर निनादला


तू तिथे मी एकरूप 

राधेचे मन होई दंग

बासरीचा घुमता नाद

कान्हाचा लाभता संग


तू तिथे मी रमतो

नाते आपुले छान

अबोल भावना अंतरी

सखी हरपते माझे भान



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance