STORYMIRROR

Prakash Patil

Romance Others

4  

Prakash Patil

Romance Others

तू नसलीस की…

तू नसलीस की…

1 min
303

तू नसलीस की हिरमुसते सारे जग मजवर, 

तू असलीस की दरवळते जणू सुगंधाने घर…  

तू नसलीस की मित्रांना तुझे सांगतो किस्से 

तू असलीस की मित्रांचाही मला वाटतो अडसर…    

तू नसलीस की पहाटवारा भासतो मज बोचरा, 

तू असलीस की मंजुळ वाटे वारयाचा स्वर… 

तू नसलीस की उदास होतो निसर्ग सारा,

तू असलीस की प्रसन्न होते जणू चराचर… 


तू नसलीस की भोवताली गर्दी होते दु:खांची,

तू असलीस की आनंदाला नच पारावर… 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance