पत्र
पत्र
1 min
464
तूझी पत्रं काढून बसलो,
की आठवणीतले एकेक क्षण
फुलून येतात,
इवली इवलीशी
नाजूक रंगबिरंगी फुले होऊन!
कागदावरच्या
तुझ्या हस्ताक्षरातील शब्दांना फुटतात पंख
आणि ते
फुलपाखरासारखे भिरभिरु लागतात ...
संपूर्ण खोलीभर तरंगत राहतो,
एक अनोखा सुगंध...
आणि हळू हळू दरवळत राहतो माझ्या रंध्रारंधातून...
खरंच, आपण भाग्यवान!
पत्रातल्या प्रेमाची ऊब
अजूनही अनुभवतोय...
ही पत्रातली जादू-
आताच्या पिढीला कशी कळणार...?
