जरा जरासा…
जरा जरासा…
1 min
320
अवचित पाऊस आज बरसला जरा जरासा,
मनातल्या मनात आज तो हसला जरा जरासा…
निघायाची घाई, म्हणे नेहमी व्यस्तता कामाची,
नेहमीपेक्षा जास्त आज तो बसला जरा जरासा…
वाटले होते किती कठोर, निष्ठुर मन त्याचे,
पण नाही वाटला आज तो तसला जरा जरासा…
गुंतले त्याच्यात मी, गंध त्याला नव्हता कधी,
कसा कोण जाणे आज तो फसला जरा जरासा…
देवाकडे किती मी घातले साकडे जयासाठी,
वाटते जमला की आज तो मसला जरा जरासा…
