एकदा ती ती दिसली होती
एकदा ती ती दिसली होती
एकदा ती ती दिसली होती, तशी पुन्हा दिसलीच नाही…
खळी पाडुनी हसली होती, तशी पुन्हा हसलीच नाही …
वाळूत स्वप्नांचे मनोरे बांधीत मज सोबती,
किनारयावर बसली होती, तशी पुन्हा बसलीच नाही…
बोलता बोलता तिला स्पर्श मी केला जरासा,
लटके तेव्हा रुसली होती, तशी पुन्हा रुसलीच नाही …
सरीवर सरी पावसाच्या झेलल्या अंगावरी,
मजसवे ती भिजली तशी, सर पुन्हा बरसलीच नाही …
त्या भेटीच्या आठवणीने मन माझे होते व्याकुळ,
तिला न काही आठवे, खंत तिला कसलीच नाही….
