STORYMIRROR

Pavan Kamble

Tragedy

4  

Pavan Kamble

Tragedy

तू मैफिलीत

तू मैफिलीत

1 min
435

तू मैफिलीत माझ्या 

आज आलीस का पुन्हा

मनाला झुरवून गेलीस का पुन्हा


मैफिल माझी रमली होती छान

तुझ्यामुळे माझी झुकली खाली मान


आधीच लागलेली मनात होती माझ्या आग

हृदयाला चटके देण्यासाठी तू मैफिलीत माझ्या

आलीस का पुन्हा..


प्रेम वगैरे काय नाही

ही आहे फक्त मोह माया

विसरून तुला मैफिलीत माझ्या

बसलो होतो मी आज


निखरलेल्या मनाला

मैफिली थोडं सजवलं होत आज

सजलेल बघून तू जळतेस का पुन्हा

तू मैफिलीत माझ्या

आलीस का पुन्हा


नको येऊ आता आठवणीतही पुन्हा

शब्दात ठेवीन साचवून मी तुला

तू मैफिलीत माझ्या येऊ नको पुन्हा

हृदयाला माझ्या अस छळू नको 

पुन्हा..


तू मैफिलीत माझ्या येऊ नको पुन्हा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy