तू माझी माउली
तू माझी माउली
तू माझी माउली तू माझी साउली ।
पाहतो वाटुली पांडुरंगे ॥१॥
तू मज येकुला वडील धाकुला ।
तू मज आपुला सोयरा जीव ॥२॥
तुका म्हणे जीव तुजपाशी असे ।
तुजविण ओस सर्व दिशा ॥३॥
तू माझी माउली तू माझी साउली ।
पाहतो वाटुली पांडुरंगे ॥१॥
तू मज येकुला वडील धाकुला ।
तू मज आपुला सोयरा जीव ॥२॥
तुका म्हणे जीव तुजपाशी असे ।
तुजविण ओस सर्व दिशा ॥३॥