STORYMIRROR

उमेश तोडकर

Romance

3  

उमेश तोडकर

Romance

तू माझी होशील

तू माझी होशील

1 min
254

पहाटे पहाटे तू माझ्या

स्वप्नात सखे येशील

अलगद डोळे मिटत सखे

माझ्या मिठीत विसावशील


प्रत्यक्ष नाही स्वप्नात तरी

सखे माझी होशील

अलगद हात हातात घेत

पुनर्जन्माचे वचन मला देशील


वाट पाहतोय प्रत्यक्षात

तुझ्या आयुष्यात येण्याची

सात जन्माच्या पल्याड जाऊन

पुन्हा पुनर्जन्म घेण्याची


त्या जन्मात नक्की सखे

तू माझी होशील

स्वप्नात नाही प्रत्यक्षात सखे

तू माझ्या आयुष्यात येशील


अलगद डोळे मिटत सखे

बाहुपाशात माझ्या येशील

स्वप्नात नाही प्रत्यक्षात सखे

तू माझीच होशील


पहाटे पहाटे तू माझ्या

स्वप्नात सखे येशील

अलगद डोळे मिटत सखे

माझ्या मिठीत विसावशील


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance