STORYMIRROR

Amol Shinde

Tragedy

2  

Amol Shinde

Tragedy

तू जण्याचं

तू जण्याचं

1 min
415

तू कधीच समजून घेतलं नाहीस

याचंच दुःख असतं नेहमी

विचार भिनं भिनत असतात

अश्रुंचे अगणित फुलं

मनात घर करत असतात

तेव्हा दुःखाच गाठोडं सैल

करून त्यातला पसारा आवरावा म्हणतो

पण मनात एक चूक-चूक असते नेहमीचं

सारं काही ठीक आहे 

तू जाण्याचं कारण नेमकं काय?


शोधाशोध नेहमीचं असते माझी

तुझ्यासाठी लिहलेल्या कविता 

अन तू दिलेल्या आठवणी 

घेऊन पुन्हा चालत असतो

आपल्या धुंदीत पण का कोणास ठाऊक

माझं नेहमीचं अश्रूंशी भांडण होतं

की तू तिला नेमकं कुठं सोडून आलास

पण त्याला ही तू दगा दिलास

म्हणून त्याची वाट अडवण बंद केलं 

अन कायमचं बंधनातून मुक्त केलं

पण मनात एक चूक चूक असते नेहमीचं

सारं काही ठीक आहे

तू जाण्याचं कारण नेमकं काय?


पावसाला ही आता दोष देण्या अर्थ नाही त्यानं त्याचं काम चोख पणे पार पाडलं

अश्रूंची वाट मोकळी केल्या पासून 

त्यानं ही मला भिजवन कुठं थांबवलं 

तू गेल्या पासून तो अन

अबोल वारा असतो सोबतीला

आता जगावं तरी कसं

अन मरावं तरी कसं

काळजाच्या कोपऱ्यातंल तुझं घर

कोणाला दवावं तरी कसं

याचं विचारात आयुष्य गेलं

पण मनात एक चूक चूक असते नेहमीचं

सारं काही ठीक आहे

तू जाण्याचं कारण नेमकं काय?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy