तू दिलेला गुलाब
तू दिलेला गुलाब
तू दिलेला गुलाब
अजुनही ताजा आहे
ह्दयात त्याला जपलाय
जीव की प्राण माझा आहे
तू पाठवलेला गुलाब
तुझ्या सारखाच गोड आहे
आपले प्रेम म्हणजे
तळहातावरचा फोड आहे
तू गुलाब आहेस
मी सतत बोचणारे काटे
ह्दयाची वाट एकच
भेटण्यासाठी वाटेला फाटे
राग येईल कसा
फुले नेली रात्रीच चोरुन
काट्यावर बाग
आली होती बहरुन
तू दिलेला पहिला गुलाब
आज ही टवटवीत आहे मनात
कधी वाटलेच नाही तो सुकलाय
प्रेमाने झुलतय हिरव्या रानात

