STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

2  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

तुला शोधतो मी...

तुला शोधतो मी...

1 min
59

तुला शोधतो मी तुला शोधतो

तुझी साथ थोडी मला मागतो

खरा वाटतो भास आता मला

धुक्याच्या कडेला तुला पाहतो

तुझी साद येता मला साजणी

पहाडात हाका तुला मारतो

किती टाळले मी तुला पावसा

तरी आसवांच्या रुपे भेटतो

कुठे राहिले गाव राणी तुझे 

जगाचा नकाशा पुन्हा चाळतो

किती फोडले मी जुने आरसे

तरी आरसा का मला भांडतो

कशी मंदिराची चढू पायरी

सखी देवता मी तुला मानतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance