STORYMIRROR

काव्य चकोर

Romance

4  

काव्य चकोर

Romance

तुला पाहताच

तुला पाहताच

1 min
447

तुला उधाणलेलं पाहताच

नजरेसमोर आठवण हिरवळून येते..

अन् स्पर्शून जाणाऱ्या लाटेसोबत

किनाऱ्याचे मन गहिवरून जाते..!!


उदासवाणा वाराही 

मग झुळुकदार वाहत राहतो..

क्षितिजकडे किनारा

टक लावुन पाहत राहतो..!!


अवघे रंग भरून डोळ्यात

जेव्हा सांज येते रंगात..

तेव्हा मिलनास तिष्ठलेलें मन

पुन्हा रमते त्याच क्षितिजात..!!


नकळत सरून जाते 

मरगळलेल्या मनाची कातरवेळ..

अन् श्वासात भरून राहतो

रातराणीचा मंद धुंद दरवळ..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance