STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

तुला माहित आहे का

तुला माहित आहे का

1 min
183

मुका बाजार दु:खांचा तुला माहीत आहे का

फुलांना शाप काटयांचा तुला माहीत आहे का 


मिळाले शल्य जन्माचे मला वाटेत प्रेमाच्या 

गुलाबी घाट धोक्यांचा तुला माहीत आहे का 


जळाला एकटा बाबा कसा आगीत सरणाच्या 

मुलांना भार बापांचा तुला माहीत आहे का


नको समजूस कमजोरी समुद्राच्या किनार्‍याला 

सुनामी वेग लाटांचा तुला माहीत आहे का 


ऋतू आलाय मरणांचा इथे युद्धात देशांच्या 

खुनी पाऊस गोळ्यांचा तुला माहीत आहेत का


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy