STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

विनोदी लावणी: माझ्या घरात शिरलाय नाग!

विनोदी लावणी: माझ्या घरात शिरलाय नाग!

2 mins
5

विनोदी लावणी: माझ्या घरात शिरलाय नाग!

मुखडा:

"माझ्या घरात शिरलाय नाग,

मी घाबरून पळाले माग!"

कोरस:

"अगं... हिच्या घरात शिरलाय नाग!

आता कशाला पळतेस माग?

त्याला वाटीने दूध पाज गं!"

कडवे १:

घरात मी एकटीच होते,

घरकामात रमले होते!

भांडी घासत होते निवांत,

तेवढ्यात सरसर आला तो घरात!

तशी दचकून उडाली माझी भंबेरी...

"माझ्या घरात शिरलाय नाग,

मी घाबरून पळाले माग!"

कोरस:

"अगं... हिच्या घरात शिरलाय नाग!

आता कशाला पळतेस माग?

त्याला वाटीने दूध पाज गं!"

(संवाद / आलाप)

[कोरस: "अगं, मग कसा होता गं तो नाग?"]

कडवे २:

लांबलचक अन् मोठा होता,

उंबऱ्यात तर तो मावत नव्हता!

फणा काढून डुलत होता,

काळाभोर होता त्याचा रंग,

रागाने फुगलेलं होतं त्याचं अंग!

मला पाहून तो करत होता राग-राग...

"माझ्या घरात शिरलाय नाग,

मी घाबरून पळाले माग!"

कोरस:

"अगं... हिच्या घरात शिरलाय नाग!

आता कशाला पळतेस माग?

त्याला वाटीने दूध पाज गं!"

कडवे ३ (शेवट):

तो पलंगाच्या खाली घुसला,

अन् अंधारात जाऊन बसला!

मी खराटा घेतला हातात,

अन् हाकलून दिला एका दमात...

मग वळवळ करत तो पळून गेला रानात!

"माझ्या घरात शिरलाय नाग,

मी घाबरून पळाले माग!"

कोरस:

"अगं... हिच्या घरात शिरलाय नाग!

आता कशाला पळतेस माग?

त्याला वाटीने दूध पाज गं!"


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance