STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Romance

तुझ्यात मला पाहते मी

तुझ्यात मला पाहते मी

1 min
281

पुन्हा चाफा बहरला

पुन्हा गंधात न्हाले मी

हरवूनी मी स्वतःस पुन्हा

तुझ्यात मला पाहते मी

सप्तरंगी ते स्वप्न तुझे

नव्याने तुझ्यात विरते मी

मोरपिशी मिठीत तुझ्या

पुन्हा नव्याने जगते मी

थांबव ना हे क्षण सारे

पुन्हा तुझ्यात सामावू दे

पिवूनी हे ओठांचे प्याले

तुझ्यात पुन्हा जगू दे

पुन्हा नवा भासे स्पर्श तो

रात चांदण्यांनी बहरली

हरवूनी मी स्वतःस पुन्हा

तुझ्यात मला पाहते मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance