तुझ्या स्पर्शाशिवाय
तुझ्या स्पर्शाशिवाय
शेवटी कुणालाच माझे दुःख कळणार नाही
आता तुझ्या स्पर्शाशिवाय देह जळणार नाही
आता आवरू मी सावरू कसा
तू झालीस कोकिळा मी झालो ससा
तू जवळ ये लवकर पुन्हा मी मिळणार नाही.
वाट बदलून पाहिली रात्र जागून पाहिली
पण तुला भेटण्याची आस मनी राहिली
तू पाहिल्या विना काळीज धडधडणार नाही.
सळसळ करती पाने वारा गातो गाणे
तुझी खबर देऊन चिमणी टिपती दाणे
पक्की खबर आल्याविना सांज ढळणार नाही
किती दिवस झाले तुला पाहून राणी
येता जाता मस्करी करून जातं कोणी
सगळं सहन होईल हा दुरावा चालणार नाही
तयारी झाली आहे सगळी आज जाण्याची
का असा उशीर केलास तू माझी होण्याची
आलीस तरी शेवटचा क्षण हा टळणार नाही..
आता तुझ्या स्पर्शाशिवाय देह जळणार नाही
