तुझ्या पलिकडे!❤️
तुझ्या पलिकडे!❤️
ह्या अनोळखी जगात जणू मी हरवत होती
विश्वासाची सारी नाती वेळे नुसार बदलत गेली
गर्दीतही एकटेपणा वाटू लागला
मनातलं हे जड ओझं हलक करायच होत
म वाटेत कसा कुठे तू अढळास
सारं कसं सहज सावरलस तू
प्रेमाचा अर्थ नव्याने पटवलास तू
अनेक चेहऱ्यानं मधे तुझ्या डोळ्यात आपुलकी वाटली
एकट असण्याची भिती ही जणू हरवून गेली
कशाचाच विचार न करता मन तुझ्या भवती खिलें
आपल्या प्रेमात मी इतकी हरवले की
तुझ्या पलिकडे ही जग असतं हे जणू विसरूनच गेले
~Sakshi🤍

