तुझ्या हसण्याने बहरला ऋतू
तुझ्या हसण्याने बहरला ऋतू
आठवतो तो दिन मजला त्या वेळेचा
तुझ्या घरी आलो होतो तुला पाहायला
स्मितहास्याने कांदेपोहे दिले तू मज हाती
तेव्हा ते हास्य पाहुनी जीव माझा आनंदला.
तुझ्या हसण्याने बहरला ऋतू जीवनाचा
काय जादू होती तुझ्या त्या गोड हसण्यात
माझ्या घरच्याना ही तू आवडली होती खास
आज ही तेवढीच घायळ करते तू लावण्यात.
वसंत ऋतूच फुलला होता माझ्या भवताली
वृक्षवेली, पक्षी गूज पडत होती माझ्या हृदयी
मी ही वसंत फुलांचा झालो होतो दरवळ
भ्रमरा भांती भ्रमण करत होतो त्या समयी.
भाग्योदय झाला माझा राणी तुझ्यामुळे
जेव्हा झाली माझी जीवनाची तू संगिनी
वर्षानुवर्षे बहरत आहे माझा वसंत ऋतू
सखे साजणी फक्त तुझ्या मंजुळ हसण्यानी.