तुझ्या आठवणींचा पाऊस
तुझ्या आठवणींचा पाऊस
चिंब भिजवून जातो
तुझ्या आठणींचा पाऊस।
पागोळ्यातून गळत राहतो
तुझ्या आठवणींचा पाऊस।
मी डोकावत राहतो खिडकीतून
तो रिमझिम बरसताना दिसतो।
वाऱ्यासही बेभान करतो
तुझ्या आठवणींचा पाऊस।
उधाणली लाट किनारी येते
स्थितप्रज्ञता भग्न करून जाते।
सागरासही उधाण आणतो
तुझ्या आठवणींचा पाऊस।
कधी संचित तळे होतो
कधी खळखळ ओहळ होतो।
तर कधी नुसताच चिखल करतो
तुझ्या आठवणींचा पाऊस।