तुझं माझं नातं
तुझं माझं नातं


तुझं माझं नातं,
साता जन्मा पलीकडचं,
श्वासापासून मनापर्यंत,
भरून राहिलेलं
तुझं माझं नातं,
सागरापेक्षा खोल,
मनाच्या गाभाऱ्यात,
दडलेलं अनमोल
तुझं माझं नातं,
खऱ्या खुऱ्या मैत्रीचं,
आदींपासून अंतापर्यंत,
फक्त असणं तुझंच
तुझं माझं नातं,
सुख दुःखाच्या पलीकडचं,
तुझ्या नावाचं कुंकू,
भाळी मी मिरविण्याचं